नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बुधवारी (दि.1) 2023-24 वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये 5.94 लाख कोटींचा संरक्षण क्षेत्राचा अर्थसंकल्प जाहीर केलाय.
गेल्या वर्षीच्या संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही तरतूद जवळपास 13 टक्क्यांनी अधिक आहे. यावेळी संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पात सरकारनं नवीन शस्त्रास्त्रांची खरेदी, सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण, संरक्षण क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा आणि आत्मनिर्भर भारत यावर मोठा भर दिलाय.
रुपया असा येणार
आयकर – 15 पैसे
एक्साईज ड्यूटी – 7 पैसे
कॉर्पोरेशन टॅक्स – 15 पैसे
जीएसटी इतर टॅक्स – 17 पैसे
कस्टम – 4 पैसे
उधारी – 34 पैसे
कॅपिटल रिसिप्ट – 2 पैसे
नॉन टॅक्स रेव्हेन्यू – 6 पैसे
रुपया असा जाणार
केंद्राच्या योजना – 17 पैसे
अर्थ आयोग – 9 पैसे
राज्यांचा हिस्सा – 18 पैसे
व्याजाची फेड – 20 पैसे
संरक्षण – 8 पैसे
अनुदान – 7 पैसे
केंद्र पुरस्कृत योजना – 9 पैसे
इतर खर्च – 8 पैसे
पेन्शन – 4 पैसे
