पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kasba Vidhan Sabha by-elections in Pune)काँग्रेसकडून (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांना उमेदवारी जाहीर झालीय. आज (दि.6) सकाळी 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसने रवींद्र धंगेकरांना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यामुळं त्यांची लढत भाजपच्या (BJP) हेमंत रासने (Hemant Rasne)यांच्याशी होणार आहे.
कसबा पोट निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर आणि रोहित टिळक यांची नावं चर्चेत होती. मात्र काँग्रेसनं धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. रासने आणि धंगेकर यांच्याकडून आज उमेदवारी अर्ज भरण्यात येणारंय.
कॉंग्रेसचे उमेदवार धंगेकर हे कसबा गणपती येथून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत.
कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
