मुंबई : बिग बॉस 16 चा विजेता घोषित झाला आहे. रॅपर म्हणून प्रसिद्ध असलेला एमसी स्टॅनने (MC Stan) हा शो जिंकला. एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी त्याला बिग बॉस 16 चा विजेता बनवले. सलमान खानने स्टेनचे अभिनंदन केले. रॅपरला बक्षीस म्हणून 31 लाख रुपये मिळाले. याशिवाय बक्षीस म्हणून एक जबरदस्त कारही मिळाली आहे.
बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठी लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले. सुरुवातीला असे वाटले की एमसी स्टॅन तिसऱ्या क्रमांकावर आहे, पण तसे नव्हते. जे लोक शो जिंकण्याचा दावा करत होते, प्रियांका चहर चौधरी ((Priyanka Chahar Choudhary) फिनालेमध्ये टॉप 3 मधून बाहेर पडली आणि शिव आणि एमसी स्टॅन शोमध्ये राहिले. सलमान खान कोणाचे नाव घेतो हे जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक होते.
सोशल मीडियावर सर्वात जास्त शिव ठाकरे (Shiv Thakarey) आणि एमसी स्टॅनच्या नावाची चर्चा होती. अखेर रविवारी रात्री बिग बाॅस 16 च्या विजेत्यांची घोषणा झाली आहे. एमसी स्टॅन याने बिग बाॅस 16 ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर प्रियंका चाैधरी ही बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्याने अनेकांना मोठा धक्का बसला.
लग्झरी लाईफमुळे स्टॅन चर्चेत
एमसी स्टॅन (MC Stan) हा पुण्याचा असून त्याचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. ‘वाटा’ या गाण्यामुळे स्टॅनला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच एमसी स्टॅनच्या बिग बॉस-16 च्या घरातील डायलॉग्सला तसेच त्याच्या हटके स्टाईलला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. एमसी स्टॅन हा त्याच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे देखील चर्चेत असतो. त्याचा ’80 हजारांचा शूजमुळे देखील तो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला होता.
