मुंबई : भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत झाला.या सोहळ्यात उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या अनुष्का मोशन पिक्चर्स प्रस्तुत अभिजित दळवी लिखित, दिग्दर्शित ‘कालसर्प’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार देण्यात आला.
विक्रम गोखलेंना समर्पित
आयुष मेहरा व बरखा सिंग यांच्या हस्ते देण्यात आलेला हा पुरस्कार कालसर्पचे लेखक, दिग्दर्शक अभिजित दळवी यांनी स्वीकारला. हा पुरस्कार त्यांनी दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांना समर्पित केला. नरेंद्र फिरोदिया हे या लघूपटाचे निर्माते आहेत. एक लाख रुपये व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्काराचं मुख्य आकर्षण राहिलं ते बॉलिवूडचं क्यूट आणि पावर कपल मानले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट. या दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 या दोघांनाही प्राप्त झाला.
रणबीर कपूरला ब्रम्हास्त्र चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला. तर गंगूबाई चित्रपटासाठी आलिया भटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. मात्र यावेळी रणबीर कपूर पूरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही त्यामुळे रणबीरच्या वतीने आलियाने पूरस्कार स्विकारला.
दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्ट, रेखा, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर बाल्कीसह अनेक सेलिब्रिंटींनी हजेरी लावली होती
