मुंबई, दि. 16 मार्च : कोविड-19 आणि इनफ्लूएंझा H3N2 या विषाणूजन्य आजाराची सद्यस्थिती आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजना यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक आज विधानभवन, मुंबई येथे घेतली.
मंत्री डॉ. तानाजी सावंत, गिरीश महाजन, अब्दुल सत्तार यांच्यासह आरोग्य विभागाचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजरच्या साथी रोखण्यासाठीच्या कृती आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना करण्यात आले.
कोविड-19 आणि इनफ्लूएंझा H3N2ची लक्षणे, तातडीने घेण्याची काळजी या याबाबत जनजागृती करण्याची सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना तातडीने सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, रुग्णालयीन सेवा तत्पर व अद्ययावत ठेवाव्यात, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या
