महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मुक्त नोटीस अनुसरून माननीय मुख्य सचिव महोदय यांच्या अध्यक्षतेखाली उद्या 20 मार्च 2023 रोजी दुपारी ठीक 12:00 वाजता मुख्य सचिव यांचे समिती कक्ष येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सध्या सुरू असलेल्या बेमुदत संपाच्या अनुषंगाने क्षेत्रीय कार्यालयाच्या एकूण उपस्थिती बाबत तसेच संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्या अनुषंगाने करावयाच्या उपायोजना किंवा कृती आराखडा इत्यादी तपशीलासह विविध विभागाच्या अ.मु.स, सचिव, प्रधान सचिव, संचालकाना बैठकीस उपस्थित राहण्याविषयीची विनंती महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
शासनाने आता खालील वेगवेगळ्या विभागाचे अ.मु.स, सचिव, प्रधान सचिव, संचालक यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार यांनाही बैठकीला उपस्थित राहण्याविषयी विनंती केली आहे.
उद्या सोमवार, उद्याचा दिवस आपल्या पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे.. कारण उद्या दुपारी 12 वाजता राजपत्रित अधिकाऱ्यांसोबत जुन्या पेन्शनबाबत सरकारची बैठक होणार आहे.. 22 मार्चला गुढीपाडवा आहे, सरकारची ‘आनंदाची शिधा’ ही मोहीम गुढीपाडव्याच्या आत लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांना कर्मचाऱ्यांची गरज आहे.सर्व प्रशासकीय यंत्रणेला सामान्य प्रशासन विभागाने पत्र लिहून उद्याच्या उद्या माहिती मागवली आहे की या संपामुळे कोणकोणत्या गोष्टी प्रभावित झालेल्या आहेत व नागरिकांना काय ताण पडत आहे.. विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत..सरकार कोंडीत सापडलेले आहे..
म्हणून उद्या जास्तीत जास्त प्रमाणात आपण सर्व उपस्थित राहून आपल्या संपाची intensity वाढवायची आहे.. तरच सरकारला जाग येईल व जुनी पेन्शन योजना 28 मार्च च्या आत ते लागू करतील..आता आर या पार ची लढाई झालेली आहे, लढाई निर्णायक आहे, अभी नहीं तो कभी नहीं..म्हणून उद्या आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील असे वाटत आहे.
