मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र लवकरच ऑनस्क्रीन कमबॅक करणार आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या या कमबॅकची वाट पाहत होते. तर त्यांचं कुटुंब देखील त्यांच्या या कमबॅकवर खुश आहेत. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र लवकरच वयाच्या 87 व्या वर्षी सिल्वर स्क्रीनवर कमबॅक करणार असल्याने त्यावर आता त्यांचा मुलगा बॉबी देओलची प्रतिक्रिया आली आहे. बॉबी देओल म्हणाला की, ‘ धर्मेंद्र आजही जेव्हा फिल्मच्या सेटवर जातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवर चमक येते.’ त्यांनी याआधी शेवटाचा चित्रपट केला होता तो म्हणजे 2018 ला आलेला कॉमेडी चित्रपट ‘यमला पगला दीवाना- फ़िर से’ यामध्ये त्यांनी मुलं सनी आणि बॉबी देओल यांच्यासह स्क्रीन शेअर केली होती. तर आता त्यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
त्याचबरोबर पुढे बॉबी म्हणाला की, ‘मी खूप उत्सुक आहे. ते 87 वर्षांचे आहेत. पण पण कामावर जाताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. अचानक हे देखील होत की, ते त्यांना कोणी तरी भेटायला येतं आणि ते आणखी एक चित्रपट साइन करतात. या वयात काम मिळंण शक्य नाही. पण काही चांगल्या निर्मात्यांसोबत आजही काम करत आहेत. त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. त्यांच्यासाठी कामाचा प्रत्येक दिवस पहिला दिवस असतो.’ असं देखील यावेळी बॉबी म्हणाला.
