मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. दौऱ्यादरम्यान ते प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. तसेच अयोध्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा दौरा हा राज्यातील राजकारणासाठी देखील महत्वाचा आहे. एकीकडे शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याने ठाकरे गटाकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
कार्यकर्ते रेल्वेने अयोध्येच्या दिशेला रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः अयोध्या दौऱ्याला जाणार असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते देखील तयारीला लागले आहे.
शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते आज ट्रेनने अयोध्येच्या दिशेला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे या शिवसैनिकांसाठी सरकारकडून ठाणे आणि नाशिक येथून सुटणाऱ्या दोन विशेष ट्रेनची सुविधा करण्यात आलेली. हे कार्यकर्ते आज अयोध्येला पोहोचणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर जात आहे. शिंदे ४० आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर जात आहे. यात ते प्रभू श्रीरामचे दर्शन, हनुमान गढीचे दर्शन घेणार आहे. याच दरम्यान ते मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेणार आहेत. शिवसैनिक 8 एप्रिलला तर, मुख्यमंत्री शिंदे 9 एप्रिलला अयोध्येत जाणार आहेत. संध्याकाळी शरयू आरती करून ते मुंबईत परततील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. दरम्यान सध्या ठाकरे गट व शिंदे गटात सुरु असलेली हिंदुत्वाची लढाई याअनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा महत्वाचा मानला जातो आहे. शिंदे अयोध्येत जाणार असल्याने योगी सरकारने देखील त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे.
