मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक रोहिता शेट्टी आता मराठीमध्ये पदार्पण करत आहे. ‘स्कूल कॉलेज आणि लाईफ’ हा त्याचा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर प्रक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. आता या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
बावरे मन असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं वलय मुलगुंड यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर पंकज पडघन फिट आणि सौरभ साळुंके यांनी हे गाणं गायलं असून या गाण्याला पंकज पडघन फिट यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटातील अनेक दर्जेदार गाण्यांमुळे प्रेक्षक या चित्रपटाकडे आकर्षित होणार हे दिसून येत आहे.
या चित्रपटामध्ये तेजस्वी प्रकाश आणि करण परब यांच्या मुख्य भुमिका आहेत. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. तर नावाप्रमाणे हा चित्रपट स्कूल आणि कॉलेज लाईफवर आधारित आहे. हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटसह रोहित शेट्टी, पवित्र गांधी आणि विवेक शाह हे दोघ प्रोड्यूस करत आहेत. तर 14 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
