राजस्थान, बुढपुरा दि. 9 जुलै 2025 (प्रतिनिधी-चित्रलेखा रासने) : राजस्थानमधील बुढपुरा हे एक गाव आहे, जिथे ७०% पेक्षा जास्त महिला तरुण वयातच विधवा होतात. धक्कादायक म्हणजे या गावाची ओळख ‘विधवांचं गाव’ अशी झाली आहे, कारण येथील पुरुषांमध्ये सिलिकोसिस (Silicosis) नावाचा आजार मोठ्या प्रमाणात पसरला आहे. हा आजार खाणींमध्ये काम करताना उडणाऱ्या धुळीमुळे होतो, ज्यामुळे फुफ्फुसांचं नुकसान होतं.
या समस्येचं मुख्य कारण म्हणजे खाणींमध्ये काम करणारे पुरुष. बुढपुरा गावाच्या आजूबाजूला असलेल्या खाणींमध्ये काम करताना, दगड फोडताना उडणाऱ्या धुळीतील सिलिका (Silica) नावाचं तत्व पुरुषांच्या फुफ्फुसात जातं. त्यामुळे त्यांना सिलिकोसिस होतो, ज्यामुळे त्यांचे अकाली निधन होते. होणारे परिणाम: फुफ्फुसांचे गंभीर नुकसान, खोकला आणि तोंडातून रक्त येणे, अकाली मृत्यू. परिणामी, गावात ७०% पेक्षा जास्त महिला तरुण वयातच विधवा होतात आणि कुटुंबाचा आधार हरवल्यामुळे त्यांनाही खाणींमध्ये काम करावे लागते, ज्यामुळे त्यांचे आयुष्य आणखी कठीण होते.
या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
