Oplus_16908288
ठाणे, दि. 10 जुलै 2025(प्रतिनिधी) : शारदा एज्युकेशन सोसायटीचे आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कला मंचातर्फे संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता गुरु शिष्य परंपरा अधोरेखित करणारा संगीत सोहळा आयोजित करण्यात आला
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते व्यास प्रतिमेचे पूजन करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. शारदा एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री अक्षर पारसनीस सर यांनी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आनंद विश्व गुरुकुल माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ .संपदा कुलकर्णी मॅडम यांनी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. प्राध्यापिका सौ फाल्गुनी नातू मॅडम यांनी आपल्या सुरेल आवाजातून अभंग गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
तसेच प्रा. श्री रविराज सर यांनी वाद्यवृंदाने त्यांना साथ दिली. या कार्यक्रमात विद्यार्थी ही सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनाने झाली . या कार्यक्रमाला संस्थेच्या सदस्या व ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ हर्षला लिखिते मॅडम उपस्थित होत्या. सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी संगीत सोहळ्याचा आस्वाद घेतला .
यावेळी उपप्राचार्या सौ दीपिका तलाठी मॅडम, पर्यवेक्षक प्रा. सागर जाधव सर , सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना औक्षण करून गुरुपौर्णिमेचा हा मंगल सोहळा विद्यार्थ्यांनी साजरा केला. आर्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कलेच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
