मुंबई, दि. 12 जुलै 2025 (प्रतिनिधी-चित्रलेखा रासने) : आजची मोठी बातमी म्हणजे युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले आहे.शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, खांदेरी, सुवर्ण दुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, जिंजी या ऐतिहासिक वारसा स्थळांचा समावेश आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार शुक्रवारी सांयकाळी ७वाजल्यापासून लाईव्ह प्रक्षेपण दाखवत भरतीयांपर्यंत पोहचली. हा संपूर्ण महाराष्ट्रा साठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही असेही ते म्हणाले. गनिमी कावा युद्ध तंत्र ठरले निर्णायक.दुर्गाचे सामरिक स्थापत्य व सांस्कृतिक महत्व सह्याद्रीच्या कुशीत वसलेले जणू सौंदर्य.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होण्यासाठी भारत सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचे नामांकन पाठवले होते या घोषणेमुळे या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि पर्यटनासाठी आणखी चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाची जागतिक स्तरावर घेतलेली दखल ही सर्व मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब आहे.
