*‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’* कार्यक्रमात
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख *रामेश्वर नाईक* यांची विशेष मुलाखत मुंबई, दि. 21 जुलै : राज्य शासनामार्फत गरजू रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षामार्फत गरजूंना त्वरित आर्थिक मदत दिली जात आहे. या निधीची कार्यपद्धती, लाभार्थ्यांसाठीची प्रक्रिया आणि विविध आजारांसाठी मिळणाऱ्या सहाय्याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
‘दिलखुलास’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. 22, बुधवार दि. 23 व गुरुवार दि. 24 जुलै 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅंपवर प्रसारित होणार आहे. तसेच, ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात मंगळवार दि. 22 जुलै 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ही मुलाखत पाहता येईल. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुक, एक्स आणि युट्यूब या समाजमाध्यमांवर देखील पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
