ठाणे, दि. 05 ऑगस्ट 2025 :- नगर भूमापन कार्यालय ठाणे अंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गावे आणि नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गावठाण नगर भूमापन झालेली गावे या सर्व गावांसाठी नगर भूमापन ठाणे कार्यालयाच्या वतीने गुरुवार, दि.07 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत फेरफार शिबिराचे आणि इप्सित या ऑनलाइन फेरफार नोंदणी करणाऱ्या पोर्टलबद्दल माहिती देण्याबाबतचे शिबिर आयोजित केली आहे.
या शिबिरामध्ये वारस नोंदी, खरेदी हक्क सोड, बोजा नोंद, बोजा कमी करणे याबाबतच्या नोंदी ऑनलाईन पद्धतीने भरून घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सहभाग नोंदणी कामी सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे नगर भूमापन अधिकारी ठाणे यांनी कळविले आहे.
