ठाणे, दि. 07 ऑगस्ट 2025 :- चिखलोली-अंबरनाथ येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाच्या तसेच नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन शनिवार, दि.9 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. तर अध्यक्षपदी ठाणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल हे असून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक, न्यायमूर्ती श्रीमती मंजुषा देशपांडे आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
चिखलोली आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या न्यायालयाकडे पाहिले जात आहे. या नवीन न्यायालयामुळे परिसरातील नागरिकांना जलद न्याय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या उद्घाटन सोहळ्यास वकील, वकिलीचे विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, चिखलोली-अंबरनाथ आणि उल्हासनगर तालुका बार ॲडव्होकेट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. संजय सोनवणे यांनी केले आहे.
