ठाणे, दि.11 ऑगस्ट 2025 : दि.27 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरिता उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचे व त्यासाठी निवड करण्याची कार्यपद्धती पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्णय क्र. पुलदे-2025 / प्र.क्र.74 (ई-1144095) / सां.का.2, दि.20 जून, 2025 या शासन निर्णयाद्वारे निश्चित केली आहे.
त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयान्वये, शासन निर्णयातील परिशिष्ट “अ” नुसार सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने सोबत जोडलेला अर्ज भरुन mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि.20 जुलै 2025 पासून गणेश चतुर्थीच्या एक दिवसापूर्वी पर्यंत ऑनलाईन सादर करावे, असे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी कळविले आहे.
