ठाणे, दि.14 ऑगस्ट 2025 :- भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार, दि.15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 09.05 वाजता उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
मुख्य समारंभानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी/व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृहात गौरव होणार आहे.
या समारंभास जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, आणीबाणी सत्याग्रही, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी जरूर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
