Oplus_16908288
ठाणे, दि. १ सप्टेंबर २०२५ : इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे येथे 31 ऑगस्ट 2025 रोजी पहिला भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला.
महामानवांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी व कर्मचारी, समाज कल्याण ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, महामंडळ अधिकारी कर्मचारी तसेच विविध योजनांचे लाभार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे अंतर्गत असलेल्या आश्रमशाळांवर विद्यार्थी फेरी, रांगोळी स्पर्धा, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले, असे इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे, सहायक संचालक यांनी कळविले आहे.
