ठाणे, दि.08 सप्टेंबर 2025 : ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातील जुनी रद्दी व इतर साहित्य विहीत पध्दतीचा अवलंब करुन निर्लेखित करुन विक्री करावयाची आहे. ही रद्दी दि.9 सप्टेंबर ते दि.12 सप्टेंबर 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध असेल. (अधिक माहितीसाठी वरिष्ठ लिपीक श्री.अविनाश सकपाळ, मो.क्र. 8369707572 यांच्याशी संपर्क साधावा.)
इच्छुक रद्दी खरेदीदारांनी कार्यालयीन वेळेत सिलबंद लिफाफ्यातील दरपत्रके जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, स्टेट बँकेच्या वर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे (प.) येथे शुक्रवार, दि.12 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे.
