मुंबई, सिनेवर्ड : बाॅलिवूडच्या या अभिनेत्रीनं वयाच्या २७व्या वर्षी तिच्या पतीला गमावलं. त्यानंतर एका निर्णयानं अभिनेत्रीचं आयुष्य बदललं. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. या अभिनेत्रीनं तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला. ही अभिनेत्री जेव्हा २७ वर्षांची होती तेव्हा तिच्या पतीचं निधन झालं. कोण आहे ही अभिनेत्री ?
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणीही नसून विद्या माळवदे आहे. पतीच्या निधनानंतर अभिनेत्रीला जीव देण्याची इच्छा झालेली, पण असं काही घडलं ज्यामुळे विद्यानं तिचा निर्णय बदलला.
२००० मध्ये दुःखाचा डोंगर तुटला
विद्या माळवदेनं १९९७ मध्ये कॅप्टन अरविंद सिंग बग्गासोबत लव्ह-मॅरेज केलं होतं, दोघंही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी होते. पण, २००० मध्ये, अभिनेत्रीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. ती २७ वर्षांची असताना तिच्या पतीचा विमान अपघातात मृत्यू झाला.
आत्महत्या करण्याची इच्छा
अभिनेत्रीचा पती त्या विमानाचा पायलट होता. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, अभिनेत्री आत्महत्या करू इच्छित होती. एका मुलाखतीत तिनं सांगितलं की, ती डिप्रेशनमध्ये गेलेली. विद्या म्हणाली की, तिनं जगण्याची इच्छा सोडून दिली होती.
अभिनेत्रीनं पालकांमुळे तिचा विचार बदलला
विद्याने झोपेच्या गोळ्या विकत घेतल्या आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. नंतर, तिच्या पालकांचे चेहरे पाहून तिने तिचा विचार बदलला. अभिनेत्रीने तिच्या आयुष्याला दुसरी संधी दिली आणि मॉडेलिंगकडे वळली. यानंतर, तिने चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आणि २००३ मध्ये ‘इंतेहा’ चित्रपटातून पदार्पण केलं. जेव्हा तिचं आयुष्य पुन्हा सुरळीत सुरू झालं तेव्हा ती दिग्दर्शक संजय दयामाला भेटली. दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी २००९ मध्ये लग्न केलं.
अभिनेत्रीनं या सिनेमांमध्ये काम केलंय
विद्याच्या कामाबद्दल सांगायचं तर ती, ‘चक दे इंडिया’, ‘किडनॅप’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘इंतहा’, ‘काली’, ‘अभय’, ‘नाम’, ‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
