खेड, दि. १५ सप्टेंबर २०२५ : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई(रजि.) तालुका शाखा खेड आणि ओबीसी व्हि.जे. एन. टी. संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सोमवार दिनांक १५/९/२०२५ रोजी आक्रोश मोर्चा काळकाई मंदिर भरणे ते तहसीलदार कार्यालय खेड पर्यंत काढण्यात आला आणि सरकाने मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट नुसार दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी लागू केला आहे तो जी. आर.(GR) रद्द करून कुणबी जातीमधील घुसखोरी थांबवावी आणि ओबीसी घटकांमध्ये मराठा जातीचा प्रवेश थांबवावा या प्रमुख मागणी सह ओबीसींच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चा मध्ये साडेपाच हजाराहून अधिक कुणबी ओबीसी महिला पुरुषांनी आपला आक्रोश, निषेध व्यक्त केला.
सहभाग-कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा-खेड, ओबीसी व्हि.जे. एन. टी.(VJNT) संघर्ष समिती
