Oplus_16908288
ठाणे, दि.16 सप्टेंबर 2025 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि.17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने ठाणे तालुक्यातील उप अधीक्षक भूमी अभिलेख, ठाणे कार्यालयाच्या अंतर्गत नगर भूमापन ओवळा, येऊर, भाईंदरपाडा व बोरीवडे गावातील नागरीकांसाठी मिळकतीच्या नोंदी अद्यावत करण्याकरिता मंगळवार, दि.23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता उप अधीक्षक भूमी अभिलेख ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे (प.) 400601 या कार्यालयात फेरफार अदालत आयेजित करण्यात आली आहे. तरी सर्व नागरीकांनी मुळ दस्तऐवज व कागदपत्रांसह कार्यालयात उपस्थित राहावे.
तसेच मौजे बोरीवडे ता. जि. ठाणे येथील गावठाण मिळकतीच्या सनद वाटपाचा कार्यक्रम मंगळवार, दि.23 सप्टेंबर 2025 रोजी अंगणवाडी शाळा, बोरीवडे येथे दुपारी 12.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या फेरफार अदालत व सनद वाटप कार्यक्रमांमध्ये नागरीकांनी सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील व उप अधीक्षक भूमी अभिलेख सचिन वाघ यांनी केले आहे.
