मुंबई, दि. 20 ऑक्टोबर 2025 : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित कुणबी कलामंच निर्मित “बळी पहाट” शोध इतिहासाचा…सत्य संस्कृतीचा निर्णय तुमच्या हाती..चला जगण्याची दिशा बदलुया या कलाकृतीचे बुधवार, दि. 22 ऑक्टोबर 2025 रोजी साहित्य संघ मंदीर, चर्नीरोड, मुंबई येथे सकाळी 6 वा. आयोजन केले आहे. गेल्या 10 वर्षांपासून कुणबी युवा मेळावा मुंबईला पार पडत आहे. समाजात जनजागृती होऊन समाज घटक संघटित व्यावा हा एकमेव द्येय आहे. या हेतूने गेल्या कित्येक वर्षे समाजाला एकत्र आणण्याचे कार्य कुणबी युवा मुंबई करत आहे.
1920 साली स्थापन झालेल्या कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचा 105 वर्षाचा दैयदिमान इतिहास आहे. यावेळी सामाजिक जीवनावर आधारित ‘निर्णय तुमच्या हाती… चला जगण्याची दिशा बदलुया’ ही नाट्यकृती सादर होणार असून कष्टकरी समाजात पुन्हा समतेचे, न्यायाचे, स्वातंत्र्याचे आणि बंधुत्वाचे बळीराज्य निर्माण व्हावे या हेतूने युवा पिढीला प्रेरित करण्यासाठी अशा वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याची विनंती कुणबी युवा मुंबई कडून केले आहे.
बळी पहाट चे वैशिष्ट्य म्हणजे खरी संस्कृती, खरा वारसा जपण्यासाठी दरवर्षी नवीन नाट्यकृती द्वारे समाजात चैतन्य निर्माण करून जागृत करायचे असे आहे. ‘भारत हा कृषी प्रधान देश असून शेतीचे शोध लावणारी आणि मातृसंस्कृती जननी “निरुत्ती” दानशूर, शेतकरी, संविधानी राजा “सम्राट बळराजा” कुलवाडी भुषण, बहुजन प्रतिपालक, रायतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज व संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे आम्ही वंशज. कुणबी शेतकरी…!! ‘जेथे युवा शक्ती, तेथे यशाची प्रचिती ही तुकाराम महारांजाची वाणी आहे. विचार बदला तर आपण बदलू शकतो. आपली परिस्थिती बदलेल. कुणबी, ओबीसी, बहुजन समाजाला योग्य दिशा हवी असेल तर आपला इतिहास जाणून त्यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून जगासोबत चालायला हवे. समतेचे विचार व बहुजनांना अधिकार हे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राज्यर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाले. त्या अधिकाराचा वापर मात्र आपल्याला करायला शिकायला हवंय….!
भारत देशात आपले अस्तित्व आणि येणाऱ्या काळात आपली दिशा कोणती असेल ? याचा विचार आजच्या युवा पिढीने करणे गरजेचे आहे. सामाजिक.. संघटन.. शिक्षण.. आरोग्य..प्रशासन आणि राजकारण या व्यवस्थेत आपली भागीदारी किती ? समाजात वैचारिक परिवर्तनासाठी युवा पिढीला योग्य विचारांची गरज असून त्यासाठी त्याग आणि समर्पणाची भावना युवकांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. म्हणूनच गेली 10 वर्षे कुणबी युवा मेळावा निमित्ताने “बळी पहाट” सत्य इतिहासावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे.
तरी वरील कार्यक्रमाला कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे संघाध्यक्ष श्री. अनिल नवगणे, सरचिटणीस श्री. कृष्णा वने, खजिनदार श्री. महेश शिर्के आणि पदाधिकारी तसेच सर्व संघ कार्यकारी प्रतिनिधी, संघ प्रतिनिधी मंडळ, युवक मंडळ, महिला मंडळ, तालुका संघ विभागीय शाखा, ओबीसी बहुजन वर्ग व कुणबी राजकीय सामाजिक नेतृत्वाना आमंत्रित करण्यात आले आहे. आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे, असे आवाहन कुणबी युवा मुंबई च्या वतीने करण्यात आली आहे.
