मुंबई, दि. 22 नोव्हेंबर – गुंतवणूक संदर्भात रूबी टॉवर दादर येथे शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी गुंतवणूकदार जनजागृती कार्यक्रम (Investment Awareness program) संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन DSP Assets Manegers यांनी म्युच्युअल फंड डिस्ट्रीबुटर श्री.कैलास शिंदे (वाशी/महागाव) व प्रुडेंट कॉर्पोरेट मुलुंड शाखा यांच्या मार्फत केले होते.
गुंतवणुक का गरजेची आहे? कोठे करावी? कोण कोणते अधिकृत माध्यम आहेत? कश्या पद्धतीत गुंतवणूक करू शकतो? यासंदर्भात वक्ते दिपक शिंदे यांनी महत्त्वपूर्णमाहिती दिली व प्रश्नोत्तरे होऊन कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाखा व कुणबी युवा तळा यांचे योगदान तसेच प्रुडंट शाखा प्रबंधक गणेश कांबळे, DSP चे ध्रुव सोळंकी यांचं सहकार्य मोलाचे होते.
