ठाणे, दि. 16 जाने 2026(प्रतिनिधी) : प्रभाग समिती प्रभाग क्रमांक मतदानाची टक्केवारी (%)
माजिवडा : १, २, ३, ८ ५४.७५%
वर्तकनगर : ४, ५, ७ ५४.८६%
लोकमान्य सावरकरनगर : ६, १३, १४, १५
५८.०९%
वागळे : १६, १७, १८ ५५.५३%
नौपाडा कोपरी : १९, २०, २१, २२ ५९.७९%
उथळसर : १०, ११, १२ ६०.६०%
कळवा : ९, २३, २४, २५ ५४.२९%
मुंब्रा : २६, ३१ ४७.५९%
मुंब्रा : ३०, ३२ ४९.१५%
दिवा : २७, २८ ५७.३७%
दिवा : २९, ३३
निवडणुकीसाठी एकूण 55.59 टक्के मतदान
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण 55.59 टक्के मतदान झाले असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली. ठाणे महानगर -पालिकेच्या एकूण 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रावर गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या 33 प्रभागांमध्ये 8 लाख 63 हजार 879 पुरूष, 7 लाख 85 हजार 831 महिला आणि 159 इतर असे एकूण 16 लाख 49 हजार 869 मतदार होते. त्यापैकी 483698 पुरूष , 433385 स्त्री आणि 40 इतर असे एकूण 917123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
