Oplus_16908288

मुंबई, दि. 6 फेब्रुवारी 2026 : अंडर-१९ वर्ल्ड कपचा फायनल सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सुरू आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. ओपनर वैभव सूर्यवंशी याने वादळी खेळी केली आहे. वैभवने १७५ धावांची खेळी करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. यामध्ये वर्ल्ड रेकॉर्डचाही समावेश आहे. जाणून घ्या.
अंडर १९ वर्ल्ड कपमधील फायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारताकडून सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशी यांने वादळी खेळी केलीय. इंग्लंडच्या गोलंदाजांना फोडून त्यांचा घाम काढलाय. पठ्ठ्याने ८० बॉलमध्ये १७५ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने १५ चौकार आणि १५ षटकारांची आतषबाजी केली असून अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वैभवने आपल्या तोडफोड बॅटींगने अंडर-१९ वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक आपल्या नावावर केले आहे. अशी कामगिरी तो एकमेव भारतीय खेळाडू तर जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.
वैभव सूर्यवंशी याने सुरूवातीपासूनच आपला दांडपट्टा सुरू ठेवला होता. पठ्ठ्याने अवघ्या ५५ बॉलमध्ये शतक गाठलं, त्यानंतरही त्याची गती थांबली नाही. उलट त्याने आणखीनच आक्रमक खेळ करायला सुरूवात केली. शेवटी १७५ धावांवर असताना तो कॅच आऊट झाला. १७५ धावा करून गेला आणि फक्त २५ धावांनी त्याचे द्विशतक हुकले. वैभव सूर्यवंशीने ७१ बॉलमध्ये १५० धावा करत इंग्लंडच्या मायस याचा रेकॉर्ड मोडला, त्याने ९८ बॉलमध्ये १५० धावा करण्याची कामगिरी केली होती. अंडर १९ वर्ल्ड कपच्या एका सीजनमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम याआधी अंडर १९ वर्ल्ड कप २०२२ मध्ये डेवाल्ड ब्रेविस याच्या १८ षटकारांसह नावावर होता.
