ठाणे, दि. १८ मार्च २०२६ : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील पत्रकारांसाठी अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पत्रकारांना म्हाडाची हक्काची घरकुले मिळाली असून या उपक्रमाचे प्रमुख श्रेय ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांना देण्यात आले. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत ठाणे शहर नियोजन समितीत त्यांच्या सहभागाचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
कोलशेत येथील संजीव आशर इमारतीतील ५३ घरांच्या लॉटरीत ४२ अर्जदार पात्र ठरले होते. यापैकी संपूर्ण रक्कम भरलेल्या पत्रकारांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरांच्या किल्ल्या देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार संजय पितळे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून म्हाडा प्राधिकरणाकडून किल्ल्या व ताबापत्र मिळवले. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बुधवारी (ता.१८ मार्च) आयोजित कार्यक्रमात पात्र पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना म्हाडा घरांच्या किल्ल्या व अंतिम ताबापत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला हा कार्यक्रम पार पडल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
शिवसेना गटनेते पवन कदम यांनी, संजय पितळे यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “ केवळ पत्रकारांच्या नव्हे तर सर्वसामान्यांच्या घरकुलांसाठीही त्यांनी जिद्दीने लढा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळासोबतच संजय पितळे यांच्या प्रयत्नांमुळेच पत्रकारांच्या घरकुलांचा हा प्रकल्प साकार झाला आहे. तेव्हा, भविष्यात मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहराच्या विकासाच्या नियोजन समितीत संजय पितळे यांचाही समावेश व्हावा,” अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली.
त्यावर बोलताना महापौर शर्मिला पिंपळोलकर म्हणाल्या की, “पत्रकारांसाठी संजय पितळे हे आज खऱ्या अर्थाने दुवा ठरले आहेत. म्हाडाच्या कागदपत्रांची पूर्तता आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करत त्यांनी पत्रकारांना हक्काचे घर मिळवून दिले. हा खरोखरच भाग्याचा क्षण आहे. शहर विकासासाठी अशा व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे असून त्यांना शहर नियोजन समितीत सहभागी करण्याचा नक्कीच विचार केला जाईल.” असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला उपमहापौर कृष्णा पाटील, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक मनोज सानप, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी तुषार राजे, नारायण शेट्टी, श्रीकांत खाडे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे आनंद कांबळे, दिलीप शिंदे, ज्येष्ठ संपादक दीपक दळवी तसेच महापालिकेच्या उप माहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांची उपस्थिती होती. या उपक्रमामुळे ठाण्यातील पत्रकारांचे घराचे स्वप्न साकार झाले असून पत्रकार संघटनेची एकजूट आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यशस्वी ठरल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
Categories
- Arogya
- kalyan
- Mohali
- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अमरावती
- अर्थकारण
- अलिबाग
- अल्पसंख्पाक विभाग
- अहमदनगर
- अहमदाबाद
- आंतरराष्ट्रिय
- आंतरराष्ट्रीय
- आंध्रप्रदेश
- आरोग्य
- इजिप्त
- उच्च व तंञ शिक्षण विभाग
- उत्तर प्रदेश
- उद्योग
- औरंगाबाद
- कल्याण
- कृषी विभाग
- कोकण भवन
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग”
- क्राईम
- क्रीडा
- क्रीडाविश्व
- खेड
- गडचिरोली
- गृह खाते
- गृहनिर्माण खाते
- चिपळूण
- चेन्नई
- छत्रपती संभाजी नगर
- जनजागृती
- जयपूर
- जल वाहतुक
- जल विभाग
- जामनगर
- जालना
- जैसलमेर
- झिम्बाब्वे
- ठाणे
- डोंबिवली
- ताज्या बातम्या
- दापोली
- दावोस
- दुर्ग
- नगरविकास
- नवी दिल्ली
- नवी मुंबई
- नागपूर
- नागालँड
- नाटक
- नाशिक
- पंढरपूर
- परिवहन
- पर्यटण
- पर्यटन
- पर्यावरण
- पालघर
- पिंपरी
- पुणे
- पुनर्वसन
- पोलंड
- प्रशासन
- फिलिपिन्स
- फेसबुक
- बीड
- बुलढाणा
- भारत
- भिवंडी
- भोपाळ
- मंञी मंडळ निर्णय
- मंञीमंडळ बैठक निर्णय
- मदत व पुनर्वसन
- मनोरंजन
- महसुल
- महाराष्ट्र
- महिला बचत गट
- महिला व बाल विकास
- माहिती आणि जनसंपर्क विभाग
- मुंबई
- रत्नागिरी
- रस्ते व महामार्ग विभाग
- राजकारण
- राजस्थान
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- रायगड
- राष्ट्रीय
- रोजगार
- रोहा
- लसीकरण
- वन संपदा
- वाहतुक पोलिस
- वाहतुक विभाग
- विज विभाग
- विधीसेवा
- विशेष
- वैद्यकीय
- शहापूर
- शालेय शिक्षण
- शिक्षण
- शिक्षा
- शिधा वाटप विभाग
- शेती
- सण-संस्कृती
- समाजकल्याण
- साऊथ
- सांगली
- सामाजिक
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक बांधकाम
- सांस्कृतिक
- साहित्य
- सिने वल्ड
- सिनेवार्ता
- सोलापूर
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
- हवामान खाते
- हेल्थ
