ठाणे जिल्ह्यातील अति दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी पाड्यांवरील नागरिकांना आरोग्य सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. माधव वाघमारे हे होते तर यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश राठोड (कोषाध्यक्ष- ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्था),
वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली शेडगे, डॉ. मेश्राम,, डॉ. दत्तात्रय धरणे (स्त्री रोग तज्ञ), डॉ. रुपाली शेंडगे, डॉ. स्नेहा भोळे (स्त्री रोग तज्ञ), डॉ. आर्यचाणक्य भोळे, डॉ. आशाताई वाघमारे, डॉ. माधवराव कावळे, डॉ. महेंद्र कांबळे, डॉ. नंदकुमार गोरडे, डॉ. अभिजित वानखेडे आदी डॉक्टरांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. डॉ. दिनानिमित्त आदिवासी भागात कार्यरत असलेल्या डॉक्टरांचा सन्मान केल्याबद्दल संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
