Oplus_16908288
वारी म्हणजे केवळ पंढरपूरची वाट नव्हे, तर तो पृथ्वीशी असलेल्या आपल्या जिवंत नात्याचा साक्षात्कार आहे. वारीच्या वाटेवर प्रत्येक पाऊल हे भूमीला केलेले एक वंदन आहे, हे भान जपण्यासाठी मी ‘भक्ती आणि पर्यावरण’ या विषयावर आधारित छायाचित्र मालिका (Photo Series) प्रकाशित करत आहे. तांत्रिक कारणांमुळे ७ ते १० जुलैचे फोटो मी आज प्रकाशित करत असून, १२ जुलै ते २५ जुलै या कालावधीत संपूर्ण प्रवासाचे रोजचे दर्शन माझ्या चॅनेलद्वारे सादर करणार आहे.
माझ्या या उपक्रमाचा उद्देश भक्तीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करणे हा आहे. वारी आणि पर्यावरण यांच्यातील हा पवित्र बंध समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या प्रतिष्ठित वृत्तपत्रातून याला स्थान दिल्यास, माझ्यासारख्या एका सामान्य माणसाच्या पर्यावरणाप्रती असलेल्या या प्रयत्नांना मोठे बळ मिळेल.
