कुणबी-ओबीसी वर्गातील अनेक मान्यवरांची उपस्थिती..
समाजात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या युवा संघटना व कार्यकर्ते यांचा करण्यात आला सन्मान,,,
मुंबई (प्रतिनिधी) पुनित खांडेकर :
बळी पहाट- शोध इतिहासाचा, सत्य सांस्कृतीचा…
ह्या बहुचर्चित कार्यक्रमाला मुंबईत समाज बांधवांची प्रचंड उपस्थिती लाभली. बलिप्रतिपदा दिवशी, शेतकरी कष्टकरी समाजाचा राजा सम्राट बळीराजा यांचा सत्य इतिहास समजून घ्यायला सकाळी 6 वाजता मुंबईतील दामोदर नाट्यगृह, परेल येथे मोठ्या संख्येने बंधू भगिनी उपस्थित होते. सोबत कुणबी युवा अध्यक्ष माधव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रस्त्वाविक व सूत्रसंचालन सचिव युवराज संतोष व सह सचिव मिलिंद चिबडे व वैभव वालम यांनी केले. महिला मंडळाच्या सेक्रेटरी दिपीका आंग्रे तसेच स्नेहा खापरे, युगंधरा काजारे, सानवी मोरे तसेच युवाचे पदाधिकारी उपाध्यक्ष डॉ. मंगेश सानप, अमेय खापरे, शैलेश कावणकर, सहसचिव वैभव वालम, मिलिंद चिबडे, रमेश करंजे आणि सहकारी यांनी नियोजन मध्ये मोलाची भूमिका पार पाडली, ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष मा. आमदार अण्णाभाऊ शेंडगे तसेच विधान परिषदेचे युवा आमदार अनिकेतभाई तटकरे, कुणबी संघाचे माजी सरचिटणीस मधुकर तोरस्कर, उपाध्यक्ष बबन उंडरे, मा. सरचिटणीस अरविंद डाफळे आणि संघ कार्यकारणी यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले. नियोजन व व्यवस्थापन कुणबी युवा ब्रिगेडच्या शिलेदारांनी उत्तम केले. संघ पदाधिकारी मा. भास्कर चव्हाण, गणेश मौले, अशोक करंजे, हरिश्चंद्र पाटील, गुहागरचे अध्यक्ष कृष्णाजी वणे, संघ कार्यकारणी सदस्य संभाजी काजरेकर, रोहा तालुका ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष सुरेश मगर, तळा पंचायत समितीच्या सभापती सौ. अक्षरा सचिन कदम कुणबी कलामंच डायरेक्ट सुभाष गोताड, सौ. रुचिता बोलाडे विचारमंचावर उपस्थित होते. बळी पहाट निमित्ताने कुणबी समाजोन्नती संघाचा १०१ वर्षाचा इतिहास यावेळी कुणबी कला मंचाच्या ७० शिलेदारांनी सादर केला, निवेदक युवराज संतोष यांच्या लेखणीतून व दिग्दर्शक सुभाष गोताड यांच्या कल्पक दिग्दर्शनाने हि कलाकृती निर्माण झाली होती. यावेळी 29 सक्रिय शिलेदार यांचा @79 मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कुणबी महिला मंडळ यांनी आयोजित केलेल्या रांगोळी व पाककला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सुद्धा यावेळी करण्यात आला.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्यावतीने समाजाला संघटीत व जागृत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोकणातील आणि राज्यातील ओबीसी कुणबी समाजाला संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारासाठी जागृत करण्याचे कार्य गेली १०१ वर्ष हि मातृसंस्था करीत आली आहे. सर्व समाजाला पूरक असे काम या समाजिक संस्थेचे नेहमीच राहिले आहे. १०१ वर्षाची गौरवास्पद वाटचाल असलेल्या संघटनेची युवा विंग “मुंबई युवा मंडळ, हे प्रचंड ताकदीने प्रबोधनाची वाट धरून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करीत आहे. समाजात पसरलेली अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, जमीन कुळकायदा, शिक्षण, रोजगार, आरोग्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन करण्याचे काम कुणबी युवा मुंबई करीत असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात जनजागृती, आंदोलन करण्याचे कार्य युवकांच्या माध्यमातून सातत्याने होते. कुणबी बहुजन समाजातील युवाशक्ती जागृत झाली असून आपल्या हक्क अधिकार आणि रणनीतीवर आधारित संघटन बांधणीचे व पुढील दिशा कोणत्या प्रकारे असेल याचे विचार मंथन करण्यासाठी प्रत्येक वर्षी “बळी पहाट” साजरी करण्यात येते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील सामाजिक विचारवंत, तसेच ओबीसी वर्गातील अभ्यासक, कुणबी समाजातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. समाजातील ही वैचारिक जागृती म्हणावी लागेल. उपस्थित राहिलेल्या सर्व बंधू भगिनी व युवा वर्गाचे, मान्यवरांचे आभार..!
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई
कुणबी युवा मुंबई











