ठाणे-मोहन म्हापार्ले (प्रतिनिधी)
रविवार, दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी “आश्रय बहुउद्देशिय साcमाजिक सेवाभावी संस्था, ठाणे(रजि. ८०-जी)” यांच्या वतीने बायजी पाडा, वान्द्रे, ता. शहापूर येथे आदिवासी पाड्यातील (दुर्गम) भागाला भेट देऊन बँल्केट वाटप केले. त्यावेळी संस्थेच्या अध्यक्ष रविंद्र बोराडे, सदस्य मिलिंद महाडीक, सदस्य विवेक काटे त्याचबरोबर शरद जाधव, संतोष मतकर, अमित घोसाळकर, राजू शिंगटे आदी सहकारी व हितचिंतक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम पार पडण्या साठी संस्थेचे आश्रयदाते जे नेहमी हिरारीने भाग घेतात ते रितेश चव्हाण, योगेश गवस, पंकज परदेशी यांचे सहकार्य लाभले. तसेच Air System co. चे अरूण उपर, Super Air co. चे संतोष पाटील, विकास पवार, राजेश सानप,
विजय क्षीरसागर, कृष्णा शिगवण, सोमा पटेल, प्रितेश चव्हाण यांनी संस्थेला आर्थिक स्वरूपात मदत केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्यांच्या माध्यमातून येथे पोहचलो ते भिंवडी ग्रामीण शाळेचे शिक्षक प्रविण वारघडे यांनी ग्रामस्थांना संस्थेची माहिती व ओळख करुन दिली. तसेच संस्थेतील सदस्यांची पुष्पहस्ते स्वागत केले. कार्यक्रमाला बायजी पाडा, नावले पाडा, घाटाल पाडा, बरफ पाडा, भवर पाडा येथील आदिवासी बांधव उपस्थित होते.
प्रथम बायजी पाड्यातील जुने अनुभवी गावकरी तान्हू भवर व प्रविण बुधाजी वारघडे (शिक्षक) यांचा सत्कार संस्धा अध्यक्ष रविंद्र बोराडे यानी पुष्प देऊन केला. आदिवासी पाड्यातील लहान मुले, महिला, पुरूष यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने प्रविण बुधाजी वारघडे(शिक्षक), बुधाजी रामचंद्र वारघडे (निवृत्त शिक्षक), शरद जाधव (एस. टी. चालक) यांचे “कोराना योद्भा” प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. आदिवासी पाड्याजवळ असलेल्या पिवळी गावातील शासकीय आश्रमशाळेला भेट दिली.







