
ठाणे, दि ११ (जि मा का) : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार सायंकाळी सातपर्यंत ५९ हजार ७८१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी १ लाख ५३ हजार ३५ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६० लाख ९५ हजार १७ नागरिकांना तर ४० लाख ५८ हजार १८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४८५ सत्र आयोजित करण्यात आले.
