आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ करिता प्रतीक्षा यादी ३ (waiting list3) प्रसिद्ध
जिल्ह्यातील १४९ बालकांची निवड
ठाणे दि. २७ (जि. प): आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ करिता प्रतीक्षा यादी ३ (waiting list3) प्रसिद्ध करण्यात आली असून जिल्ह्यातील १४९ बालकांची निवड झालेली आहे. ज्या बालकांची निवड झाली आहे त्यांच्या पालकांनी संबधित शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी केलें आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये व सर्व शासकीय नियमांचे पालन करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे. वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इ १ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी शासनाकडून दरवर्षी या घटकातील बालकांसाठी २५ % मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते .
पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a) प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
b) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि अलॉटमेंट लेटर (Allotment Letter ) ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.

