मुंबई, दि. 3 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या प्रशासकीय सुधारणा, रचना व कार्य सचिव इंद्रा मालो यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर, उपसचिव ज. जी. वळवी, कक्ष अधिकारी जयवंत पाटिल यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

