ठाणे, दि. २ (जिमाका): मुंबई महानगर क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास सुरूवात होत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुला-मुलींनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन स्वत:बरोबरच कुटुंबाचं कोरोनापासून संरक्षणासाठी सज्ज होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात दहा केंद्रावर लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या सकाळी दहाच्या सुमारास वर्तक नगर माध्यमिक विद्यालय येथे करण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय शहापूर, भिवंडी, ग्रामीण रुग्णालय मुरबाड तसेच प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणार आहे. शहापूर तालुक्यातील वासिंद, अंबरनाथ तालुक्यातील वांगणी, कल्याण तालुक्यातील खडवली, भिवंडी तालुक्यातील आनगाव आणि मुरबाड तालुक्यातील शिवळा या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.
गोवेली येथील जीवनदिप कॉलेज आणि वरप येथील सेक्रेड हायस्कूल, अंबरनाथ नगरपरिषद, ऑर्डीनन्स फॅक्टरी, बदलापूर नगरपरिषद कोंडिलकर हॉल येथे देखील लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रावर सकाळी ९ ते ५ यावेळेत लसीकरण करण्यात येणार असून यासाठी कोविन संकेतस्थळावर दि. १ जानेवारीपासून रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्यावतीने उद्या सकाळी दहा वाजता ब्राह्मण शिक्षण मंडळ संचलित वर्तक नगर माध्यमिक विद्यालय येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ पालकमंत्री श्री.शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत होणार आहे.
Categories
- Arogya
- kalyan
- Mohali
- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अमरावती
- अर्थकारण
- अलिबाग
- अल्पसंख्पाक विभाग
- अहमदनगर
- अहमदाबाद
- आंतरराष्ट्रिय
- आंतरराष्ट्रीय
- आंध्रप्रदेश
- आरोग्य
- इजिप्त
- उच्च व तंञ शिक्षण विभाग
- उत्तर प्रदेश
- उद्योग
- औरंगाबाद
- कल्याण
- कृषी विभाग
- कोकण भवन
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग”
- क्राईम
- क्रीडा
- क्रीडाविश्व
- खेड
- गडचिरोली
- गृह खाते
- गृहनिर्माण खाते
- चिपळूण
- चेन्नई
- छत्रपती संभाजी नगर
- जनजागृती
- जयपूर
- जल वाहतुक
- जल विभाग
- जामनगर
- जालना
- जैसलमेर
- झिम्बाब्वे
- ठाणे
- डोंबिवली
- ताज्या बातम्या
- दापोली
- दावोस
- दुर्ग
- नगरविकास
- नवी दिल्ली
- नवी मुंबई
- नागपूर
- नागालँड
- नाटक
- नाशिक
- पंढरपूर
- परिवहन
- पर्यटण
- पर्यटन
- पर्यावरण
- पालघर
- पिंपरी
- पुणे
- पुनर्वसन
- पोलंड
- प्रशासन
- फिलिपिन्स
- फेसबुक
- बीड
- बुलढाणा
- भारत
- भिवंडी
- भोपाळ
- मंञी मंडळ निर्णय
- मंञीमंडळ बैठक निर्णय
- मदत व पुनर्वसन
- मनोरंजन
- महसुल
- महाराष्ट्र
- महिला बचत गट
- महिला व बाल विकास
- माहिती आणि जनसंपर्क विभाग
- मुंबई
- रत्नागिरी
- रस्ते व महामार्ग विभाग
- राजकारण
- राजस्थान
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- रायगड
- राष्ट्रीय
- रोजगार
- रोहा
- लसीकरण
- वन संपदा
- वाहतुक पोलिस
- वाहतुक विभाग
- विज विभाग
- विधीसेवा
- विशेष
- वैद्यकीय
- शहापूर
- शालेय शिक्षण
- शिक्षण
- शिक्षा
- शिधा वाटप विभाग
- शेती
- सण-संस्कृती
- समाजकल्याण
- साऊथ
- सांगली
- सामाजिक
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक बांधकाम
- सांस्कृतिक
- साहित्य
- सिने वल्ड
- सिनेवार्ता
- सोलापूर
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
- हवामान खाते
- हेल्थ
