मुंबई, दि. 7 :- प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे राज्य शासनाचे धोरण आहे. पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ नवीन सदनिकांची सोडत त्याच धोरणाच्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. ‘सर्वांसाठी घरे’ हा कार्यक्रम शासनामार्फत प्राधान्याने राबविणार असून म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुणे येथील जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 नवीन सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई येथील शासकीय निवास स्थानातील कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी अधिकारी नितीन माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सामान्य माणसाला घर आणि बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी राज्य शासनाने अनेक मोठे निर्णय घेतले. त्याचे चांगले परिणाम आता दिसायला लागले आहेत. कोरोना संकटकाळात मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे बांधकाम क्षेत्राला उर्जितावस्था मिळाली. राज्यातल्या सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घरे’ कार्यक्रमांतर्गत सर्वांना हक्काचे घरे देण्याचा प्रयत्न आहे. कोरोनामुक्तीसाठी लसीकरण हेच मोठे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
या लॉटरीच्या निमित्ताने ज्यांना हक्काची घरे मिळणार आहेत, त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. इतरांनी निराश न होता, म्हाडाच्या पुढच्या सोडतीत भाग घेण्याचे आवाहनउपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी केले.
Categories
- Arogya
- kalyan
- Mohali
- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अमरावती
- अर्थकारण
- अलिबाग
- अल्पसंख्पाक विभाग
- अहमदनगर
- अहमदाबाद
- आंतरराष्ट्रिय
- आंतरराष्ट्रीय
- आंध्रप्रदेश
- आरोग्य
- इजिप्त
- उच्च व तंञ शिक्षण विभाग
- उत्तर प्रदेश
- उद्योग
- औरंगाबाद
- कल्याण
- कृषी विभाग
- कोकण भवन
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग”
- क्राईम
- क्रीडा
- क्रीडाविश्व
- खेड
- गडचिरोली
- गृह खाते
- गृहनिर्माण खाते
- चिपळूण
- चेन्नई
- छत्रपती संभाजी नगर
- जनजागृती
- जयपूर
- जल वाहतुक
- जल विभाग
- जामनगर
- जालना
- जैसलमेर
- झिम्बाब्वे
- ठाणे
- डोंबिवली
- ताज्या बातम्या
- दापोली
- दावोस
- दुर्ग
- नगरविकास
- नवी दिल्ली
- नवी मुंबई
- नागपूर
- नागालँड
- नाटक
- नाशिक
- पंढरपूर
- परिवहन
- पर्यटण
- पर्यटन
- पर्यावरण
- पालघर
- पिंपरी
- पुणे
- पुनर्वसन
- पोलंड
- प्रशासन
- फिलिपिन्स
- फेसबुक
- बीड
- बुलढाणा
- भारत
- भिवंडी
- भोपाळ
- मंञी मंडळ निर्णय
- मंञीमंडळ बैठक निर्णय
- मदत व पुनर्वसन
- मनोरंजन
- महसुल
- महाराष्ट्र
- महिला बचत गट
- महिला व बाल विकास
- माहिती आणि जनसंपर्क विभाग
- मुंबई
- रत्नागिरी
- रस्ते व महामार्ग विभाग
- राजकारण
- राजस्थान
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- रायगड
- राष्ट्रीय
- रोजगार
- रोहा
- लसीकरण
- वन संपदा
- वाहतुक पोलिस
- वाहतुक विभाग
- विज विभाग
- विधीसेवा
- विशेष
- वैद्यकीय
- शहापूर
- शालेय शिक्षण
- शिक्षण
- शिक्षा
- शिधा वाटप विभाग
- शेती
- सण-संस्कृती
- समाजकल्याण
- साऊथ
- सांगली
- सामाजिक
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक बांधकाम
- सांस्कृतिक
- साहित्य
- सिने वल्ड
- सिनेवार्ता
- सोलापूर
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
- हवामान खाते
- हेल्थ

