नवी मुंबई, दि. 21 : कोकण विभागीय स्तरावरील प्रजासत्ताकदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनी बुधवार दि.26 जानेवारी 2022 रोजी कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात सकाळी 9.15 वा. शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.
राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभास नागरिक, पत्रकार, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे. उपस्थितांनी मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे तसेच शासनाने दिलेल्या कोरोना संदर्भातील सूचनांचे पालन करावे. असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय महसूल आयुक्त विलास पाटील यांनी केले आहे.

