
ठाणे, दि. 26 – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी श्रीमती सीमा नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्यप्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक चव्हाण, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रेवती गायकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
