


शिक्षा आणि जनसेवा संस्थेकडून मुरबाड व उत्तरप्रदेशातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे मोफत वाटप
ठाणे, दि. 27 ः भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिक्षा आणि जनसेवा या नोंदणीकृत संस्थेमार्फत ठाणे जिल्ह्यातील मुरबाडातील आदिवासी पाडयांत असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना व उत्तर प्रदेशातील 5 जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे मोफत वाटप करण्यात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अखिलेश कुमार पाण्डेय आणि सचिव बसंत जैन यांनी दिली.
महाराष्ट्रच्या ठाणे जिल्ह्यात मुरबाड येथील जिल्हा परिषद शाळा फांगणे, जिल्हा परिषद शाळा पेजवाडी, जिल्हा परिषद शाळा करपटवाडी
आणि उत्तरप्रदेशच्या जौनपुर जिल्ह्यातील पाच जिल्हापरिषद शाळा अनुक्रमे कल्याणपुर, बर्ज़ी, गोंठवा, रामपुर आणि भाटपुरा येथे एकूण 700 मुलांना शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले-
वही, पेंसिल, पेन, खोड रबर आणि शॉपनरसह सर्व मुलांना पेन्सील बॉक्स देण्यात आले व सर्व मुलांना खाऊ (स्वल्पाहार) देण्यात आले.
ठाणे, मुरबाड येथील शैक्षणिक वस्तु वितरण समारंभात विजयशंकर पाण्डेय, सीए अखिलेश पाण्डेय, सीए बसंत जैन, सीए चंद्रशेखर जागावत, रितेश पाण्डेय आणि अशोक केदार पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
