ऑनलाईन रोजगार मेळावा
ठाणे दि.27 :- ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्ताने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी दिनांक 28 व 29 जानेवारी 2022 या कालावधीत http://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या पोर्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी त्यांचा नोंदणी/आधार क्रमांक व पासवर्ड वापरुन वेब पोर्टलवर Employment-Job Seeker मध्ये लॉगिन करुन Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लीक करावे व रोजगार मेळाव्याच्या यादीतील जिल्हा निवडून रोजगार मेळाव्याची व रिक्तपदाची माहिती पाहून ऑप्शनवर क्लीक करावे व या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता ह.जावळे यांनी केले आहे.
