
सुधागड पाली, ३१ जाने : को.ए. सो.डॉ.प्रभाकर रामचंद्र गावंड विद्यालय परळी येथे सुधागड रहिवासी संघ, ठाणे यांजकडून पितृछत्र हरपलेले विद्यार्थी, अपंग विद्यार्थी तसेच स्कॉलरशिप एस.टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी वाटप कार्यक्रम दि.(31) सोमवारी संपन्न झाला. अशा पद्धतीचा अनोखा व उपयुक्त उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची नवी उमेद निर्माण झाली आहे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणत्याही अडचणी उदभवू नयेत यासाठी परळी विद्यालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या मदतीने सातत्याने प्रयत्न व मदत केले जातात.
सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे चेअरमन ऍड्.प्रविणभाई कुंभार हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या सोई सुविधा व सवलतींचा पुरेपूर वापर करून मन लाऊन सातत्यपूर्ण व एकाग्रता राखून अभ्यास करावा , व शैक्षणिक प्रगती साधावी असे आवाहन ऍड: प्रवीण कुंभार यांनी आवाहन केले. यावेळी विद्यार्थी तसेच विठ्ठल घाडगे सर अध्यक्ष, सुधागड रहिवासी संघ, ठाणे व. श्री.निंबाळकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.फोटो ओळ 1, प्रभाकर गावंड विद्यालयात पितृछत्र हरपलेले विद्यार्थी, अपंग विद्यार्थी तसेच स्कॉलरशिप एस.टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी वाटप करताना ऍड: प्रवीण कुंभार , विठ्ठल घाडगे दिसत आहेत.
