ठाणे दि.31 :- ठाणे येथील श्रीमती आरती अमित ढिगीया, (वय 28 वर्षे, रा. कांती किराणा पोखरण रोड नं.2, गांधी नगर, पांड्ये निवास समोर ठाणे) ही महिला बेपत्ता झाल्याची नोंद कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन असे :-
रंग सावळा, उंची 5 फुट 1 इंच, अंगानेमध्यम, नाक बसकेमोठे, डोक्याचे केस काळे, चेहरा उभट, डोळे काळे, बोली भाषा-मराठी, हिंदी भाषा बोलतात, डाव्या हातामध्ये गोल स्टिलचे कडे असून उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये चांदीची अंगठी, पायामध्ये काळी सँडल घातली आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स घातलेली आहे.
वरील वर्णनाची महिला जर कोणाला आढळल्यास कापुरबावडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कापुरबावडी पोलीस स्टेशन, ठाणे शहर यांनी केले आहे.
