
ठाणे, दि. 1 : राज्य सरकारी कर्मचारी संघटना जिल्हा ठाणे यांच्यातर्फे स्व. र. ग. कर्णिक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येथील नियोजन भवन परिसरात ‘रक्तदान शिबिर’ आयोजित करण्यात आले. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.
या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, रक्त संकलन अधिकारी डॉ. गौरवी बागुल यांच्या माध्यमातून रक्त संकलनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
यावेळी 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्राची चाचड, सरचिटणीस भास्कर गव्हाळे, उपाध्यक्ष दिपेश तांडेळ, अध्यक्ष-चतुर्थ श्रेणी संघटना प्रदिप मोरे, अजय कोळी, रतन लोखंडे, किसन मोरे यांनी परिश्रम घेतले.
या शिबिरास बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना अध्यक्ष मिलींद सरदेशमुख, श्री. अपर राज्यकर आयुक्त गोविंद बिलोलीकर, राज्यकर सह आयुक्त बी.एस. टोपे, शिवाजी दिवटे यांनी भेट दिली.
