
ठाणे : ता. २ : ठाणे पश्चिम येथील लोकमान्य नगर पाडा नं. २ येथे दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही ४ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री गणेश मंदिर ट्रस्ट तर्फे माघी गणेश जयंती उत्सव आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे २१ वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी देखिल विविध कार्यर्कमांचे कोरोना नियामंचे पालन करीत आयोजन करण्यात आले आहे.
ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नं. २ येथे दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्री गणेश मंदिरातर्फे माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येणार आहे. सोहळ्याच्या दिवशी गणेशाचे अभिषेक व गणेश याग पूजा आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन व प्रसाद घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, तसेच सोबतच कोरोना सारख्या ओढवलेल्या जागतिक महामारीशी सामना करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन ट्रस्टचे संस्थांपक/अध्यक्ष श्री. हंनुमंत ज्ञानू जगदाळे(शेठ) जेष्ठ नगरसेवक, विरोधी पक्षनेते ठा.म.पा. यांनी केले. अमोल गुरुजी व सहकारी यांनी पुजेचे आयोजन केले आहे.
