ठाणे दि. 2 :- जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक कायद्या नुसार गठित करण्यात जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकिय समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या समितीवर काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक सोसायटीकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक सोसायटीचे सदस्य सचिवांनी केले आहे.
जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक कायदा (जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक सोसायटी स्थापना) नियम 2000 नुसार ठाणे जिल्ह्यात जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकिय समितीवर 10 ते 11 अशासकिय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील गोशाळा/पांजरापोळ संस्थापैकी एका संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याण विषयक कार्य करणऱ्या सेवाभावी संस्थांचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती, संबंधित जिल्ह्यातील मानवहितकारक कार्य करणारे / प्राणी कल्याणासाठी कार्य करणारे 5 ते 6 कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे.
या निकषात बसणाऱ्या नागरिकांनी पोलीस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी करून क्षेत्रनिहाय संपूर्ण माहितीचा परिपूर्ण प्रस्ताव सदस्य सचिव, जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी, ठाणे तथा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त (पत्ता मुलुंड कोर्ट इमारत, पहिला मजला, टोपीवाला कॉलेज बिडिंग, सरोजनीदेवी नायडू मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई-80) यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात यावे, असे पशुसंवर्धन विभागाने कळविले आहे.
