
ठाणे दि. 04 :- राज्य सरकारी कर्मचारी संघटना जिल्हा ठाणे यांच्या वतिने स्व. र. ग. कर्णिक यांचे स्मृति प्रित्यर्थ नेत्र चिकित्सा शिबिर आज दि.04 फेब्रुवारी 2022 रोजी वस्तु व सेवाकर कार्यालय सभागृह, येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, गोपीनाथ ठोंबरे, तहसीलदार महसूल ठाणे राजेंद्र चव्हाण, जनसंपर्क अधिकारी, वस्तु व सेवाकरकार्यालय ठाणे शिवाजी दिवटे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी वावीकर चॅरिटेबल ट्रस्ट, यांच्या सौजंन्याने डॉ. प्राची संखे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. डॉ. नरेंद्र पाटील, युनिक हेल्थकेअर यांच्यावतीने सर्वांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीम. प्राची चाचड (अध्यक्ष), भास्कर गव्हाळे (सरचिटणीस), दिपेश तांडेल (उपाध्यक्ष), प्रदिप मोरे (अध्यक्ष चतुर्थ श्रेणी संघटना), रतन लोखंडे, अनिल घेगडमल, किसन मोरे, श्रीमती गवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
