ठाणे, दि. ४ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ठाणे जिल्ह्यातील २८ हजार १९९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात १ लाखापेक्षा अधिक नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २३ लाख ९ हजार ३१५ डोसेस देण्यात आले.जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६७ लाख ८८ हजार ७९ नागरिकांना तर ५४ लाख १९ हजार ९४३ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १ हजार २९३ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३९० लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.

