
रोहा, दि: ०४ फेब्रु, पुनित खांडेकर (प्रतिनिधी) : रोहा, दमखाडी येथील माघी गणेशाच्या आगमना वेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी लावली हजेरी आणि पालखी सोहळ्यात सर्वांसोबत लेझीम खेळण्याचा आनंद घेतला. आमदारां सोबत अनेक स्थानिक कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
आपण देखील सामान्य जनतेचाच एक भाग आहोत या भावनेने आमदार नेहमीच कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये वावरतांना आपल्याला बघायला मिळतात. त्याच प्रमाणे यावेळी देखील ते पालखी सोहळ्यात लेझीम खेळतांना पहावयास मिळाले. आपल्या हातून जनतेची सेवा अखंड घडत राहो अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करून कार्यकर्त्यांचा त्यांनी निरोप घेतला.
