
मुंबई, परेल 6 जाने पुनित खांडेकर (प्रतिनिधी): समाजोन्नती संघ मुंबई सलग्न कुणबी महिला मंडळ, मुंबई यांचे हळदीकुंकू समारंभ व वैचारिक प्रबोधन शिबीर रविवार दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ठीक 3 वाजता कुणबी ज्ञाती गृह (वाघे हॉल), सेंट झेवियर स्ट्रीट, परेल, मुंबई-12. येथे संपन्न झाला.
कुणबी समाजातील स्त्री वर्गाने एकत्र यावे संगठित व्हावे या उद्देशाने कुणबी महिला मंडळाने वैचारिक हळदीकुंकू ही संकल्पना सत्यात उतरवली.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ साहेव व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहून करण्यात आली. सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते: प्रा. सुनिल देवरे सर यांचे उद्बोधन लाभले. महिलांची कुटुंब, भावकी, गाव, समाजातील भूमिका व योगदान याबाबत त्यांनी प्रबोधन केले.
कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा ताई पाटील व सहकारी पदाधिकारी यांनी योग्य नियोजन केले असून, सूत्रसंचालन महिला सचिव प्रा.सौ. दिपीका आंग्रे यांनी केले, सामाजिक विचारांची देवाणघेवाण या कार्यक्रमात झाली, महिलांच्या समस्या, प्रश्न आणि समाजातील त्यांचे अस्तित्व यावर सर्वच वक्त्यांनी भाष्य केले. तुळशी रोपटे देऊन व हळदीकुंकू लावून समस्त स्त्री वर्गाचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाला विक्रोळी शाखा, मुलुंडच्या महिला मंडळ, वसई विरार , ठाणे भागातून महिला, युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. उपाध्यक्षा सौ. आरती ठोंबरे, सौ. अश्विनी बाईत, सहसचिव स्नेहा खापरे, युगंधरा काजारे, सौ. मीनाक्षी डोंगरकर, तसेच कुणबी संघ कार्यकारणी सदस्या सौ. रुचिता बोलाडे, सौ. सानवी मोरे, सौ. करुणा पाटील, मंगला तोरस्कर, प्रतिक्षा कालप-निवाते, शिवकन्या नम्रता शिरकर यांनी नियोजनात मोलाचे योगदान दिले.यावेळी कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे, प्रचार प्रमुख सचिन रामाणे, सहप्रचारक प्रमुख सचिन देवळे, चिपळूण कुणबी युवाचे निलेश कोकमकर, तालुका तळा युवाचे सेक्रेटरी महेश आंबवले त्याच प्रमाणे कुणबी वसति गृहातील विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रमाला महिला, युवतीं उपस्थित होत्या. सर्वांचे आभार मानून कार्यक्रम सांगता करण्यात आली.

जबरदस्त सर
अत्यंत चांगल्या प्रकारे बातम्या देता. धन्यवाद् सर
धन्यवाद! असेचप्रेम आणि सहकार्य असु दे.