
नवी दिल्ली, ७ फेब्रु : बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत ‘भिम’ ही भूमिका साकारणारे अभिनेता प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे. दिल्लीमधील अशोक विहार येथील राहत्या घरी प्रवीण कुमार सोबती यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षाचे होते. अनेक दिवस ते आजारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यांची कन्या निपुणिकानं दिलेल्या माहितीनुसार त्यांना सोमवारी रात्री 9.30 वाजता ह्रदयविकाराचा झटका आला होता. पंजाबमधील तरणतारण हे प्रवीण कुमार सोबती यांचे मूळ गाव होते. त्यांच्या महाभारत या मालिकेतील ‘भिम’ या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. प्रवीण कुमार सोबती यांनी 30 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
